दासबोध

विकिस्रोत कडून

दासबोध हा समर्थ रामदासांनी रचला. त्याचे लिखाण त्यांचे पट्टशिष्य कल्याण स्वामींनी केले. रायगड जिल्ह्यातील अत्यंत निबीड अरण्यात विसावलेल्या शिवथरची घळ या ठिकाणी हे लेखन झाले. दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत.

एकेका समासात एक एक विषय घेऊन समर्थांनी सांसारिकांच्या, साधकांच्या, निस्पृहांच्या, विरक्तांच्या, सर्व सामान्यांच्या, बालकांच्या, प्रौढांच्या,जराजर्जरांच्या अशा सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांच्या मानवी मनाला उपदेश केला आहे. या ग्रंथाचे पारायण देखील करतात.

महाराष्ट्र सरकारच्या अधीन असलेल्या राज्य मराठी विकास संस्थेने ७,८०० ओव्यांचा हा ग्रंथ ऑडियो स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे. शास्त्रीय गायक संजय अभ्यंकर यांच्या आवाजातल्या या ऑडियोरूपांतरित दासबोधाचे संगीत राहुल रानडे यांचे आहे.

समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाचे वर्णन खालीलप्रमाणे करून ठेवले आहे...

भक्तांचेनि साभिमानें। कृपा केली दाशरथीनें। समर्थकृपेचीं वचनें। तो हा दासबोध ॥श्रीराम॥
वीस दशक दासबोध। श्रवणद्वारें घेतां शोध। मनकर्त्यास विशद। परमार्थ होतो ॥श्रीराम॥
वीस दशक दोनीसें समास। साधकें पाहावें सावकास। विवरतां विशेषाविशेष। कळों लागे ॥श्रीराम॥
ग्रंथाचें करावें स्तवन। स्तवनाचें काये प्रयोजन। येथें प्रत्ययास कारण। प्रत्ययो पाहावा ॥श्रीराम॥
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

  1. दासबोध/दशक पहिला - स्तवनांचा
  2. दासबोध/दशक दुसरा - मूर्खलक्षणांचा
  3. दासबोध/दशक तिसरा - सगुणपरीक्षा
  4. दासबोध/दशक चौथा - नवविधाभक्तीचा
  5. दासबोध/दशक पांचवा - मंत्रांचा
  6. दासबोध/दशक सहावा - देवशोधनाचा
  7. दासबोध/दशक सातवा - चौदा ब्रह्मांचा
  8. दासबोध/दशक आठवा - मायोद्भवाचा
  9. दासबोध/दशक नववा - गुणरूपाचा
  10. दासबोध/दशक दहावा - जगज्योतीचा
  11. दासबोध/दशक अकरावा - भीमदशक
  12. दासबोध/दशक बारावा - विवेकवैराग्यनाम
  13. दासबोध/दशक तेरावा - नामरूप
  14. दासबोध/दशक चौदावा - अखंडध्याननाम
  15. दासबोध/दशक पंधरावा - आत्मदशक
  16. दासबोध/दशक सोळावा - सप्ततिन्वयाचा
  17. दासबोध/दशक सतरावा - प्रकृतिपुरुषाचा
  18. दासबोध/दशक अठरावा - बहुजिनसी
  19. दासबोध/दशक एकोणिसावा - शिकवणनाम
  20. दासबोध/दशक विसावा - पूर्णदशक


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.