सदस्य:Aparna Gondhalekar

विकिस्रोत कडून

 नमस्कार,माझ्या सदस्य पानावर आपल्या सगळ्यांच स्वागत आहे!!!
 मी अपर्णा गोंधळेकर,पुणे , महाराष्ट्र. गेली १५ वर्षे renewable energy and solid waste management या क्षेत्रा मध्ये काम केले आहे. सध्या आवडी साठी काम करणे सुरू केले आहे.
 पर्यावरण हा माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळे सध्या पर्यावरण गतिविधी संतुलन या संस्थेसोबत पर्यावरण आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टींवर काम सुरू आहे.
 मानवाचे मानसिक स्वास्थ (Psychology) हा विषय विद्यापीठ शिक्षणा पासूनच आवडीचा आणि गरज भासणारा होता, पण त्यावर काम करण्याची संधी मिळाली नव्हती.
 करोना काळात या विषया संदर्भात अधिक वाचन आणि पुष्पऔषधी आणि बारक्षार या उपचार पद्धतीचे शिक्षण घेतले. त्याचा वापर करून लोकांना मदत करणे सुरू आहे.
 मराठी ही माझी मातृभाषा आहे. इतरांप्रमाणे मलाही ती टिकली पाहिजे खरतर वाढली पाहिजे असे कायमच वाटत असायचे पण काय करायचे हे कळत नव्हते.
 त्यामुळे फक्त इच्छा होती आणि प्रत्यक्षात मात्र काहीच नव्हत त्याच कायमच वाईट वाटायच. मराठी विकिपीडिया या उपक्रमा मुळे प्रत्यक्ष काम करण्याची संधि उपलब्ध झाली आहे.
 धन्यवाद सुबोध दादा कुलकर्णी आणि टीम!!